क्राईम
ब्रेकिंग! जनतेची झोप उडवणाऱ्या दरोडेखोर टोळीवर पोलिसांनी केला गोळीबार

- गेल्या पाच, सहा दिवसांपासून विजयपूर शहरातील जनतेची झोप उडवणाऱ्या दरोडेखोर टोळीवर पोलिसांनी गोळीबार केला असून एक गोळी एका दरोडेखोरास लागली तर तिघे पळून जाण्यास यशस्वी झाले आहेत. रात्रभर दरोडेखोरावर पाळत ठेवून कारवाई करणाऱ्या पोलिसांना अखेर यश आले आहे.
- विजयपूर जिल्ह्यात गेल्या एक आठवड्यापासून दरोडेखोरांची टोळी वेगवेगळ्या भागात दरोडा टाकून सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडलेल्या होत्या. विजयपूर पोलिसांसाठी आव्हान असलेल्या या टोळीतील एकास जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
- विजयपूर शहराजवळील टोल नाक्याजवळ पहाटे तीन वाजता पळून जाणाऱ्या दरोडेखोरावर पोलिसांनी गोळ्या झाडल्या.
- शहरातील कनकदास वसाहत येथे घरफोडी झाल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली माहिती मिळताच पोलिसांनी दरोडेखोरांचा पाठलाग करून टोलनाक्याजवळून पळून जात असताना गोळीबार केला. यात मूळचा मध्य प्रदेशचा रहिवासी असलेल्या महेशला गोळी लागली. उर्वरित तिघे फरार असून त्यांच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. एका शेताजवळ दरोडेखोरांवर गोळीबार करताना अंधार असल्याने गोळी कुणाला लागली हे समजले नाही. थोडे उजाडताच पहाटे त्याच ठिकाणी शोध घेत असताना एक दरोडेखोर जखमी अवस्थेत पडलेला दिसला. नंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
- दरम्यान, सध्या एका दरोडेखोरास अटक करण्यात आली असून इतरांना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी सांगितले.



