हवामान

ब्रेकिंग! पहाटेपासूनच मुंबईत पावसाची तुफान बॅटिंग

  • राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली होती. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान नोंदवले गेले. काही दिवस विश्रांती मिळाल्यानंतर आता पुन्हा एकदा हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
  • बंगालच्या उपसागरात तसेच मध्यप्रदेशात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाची तीव्रता वाढली आहे. यामुळे राज्यातील काही भागांसाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, कोकण आणि मराठवाडा विभागासाठी ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली आणि घाटमाथा भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जाहीर आहे.
  • मुंबईत आज सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. वाऱ्यासह बरसणाऱ्या सरींमुळे रस्त्यांवर पाणी साचले असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालकांचीही सकाळी चांगलीच तारांबळ उडाली.

Related Articles

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa