महाराष्ट्र

महिला आमदारांची सिंघम स्टाईल!

राज्यातील एका महिला आमदारांची सिंघम स्टाईल दिसून आली. त्यांनी मध्यरात्री अवैध बारवर धाड टाकली. तसेच अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात खरडपट्टी केली. वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असलेल्या कामाच्या गतीबाबत नाराजी व्यक्त करत समंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत झापले.

वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामाची मध्यरात्री प्रत्यक्ष स्थळांवर भेट देऊन पाहणी केली. आमदार दुबे यांनी रात्री बारा ते पहाटे पाच वाजेपर्यंत वसई पूर्वेच्या अग्रवाल नाका परिसर, स्टार सिटी जूचंद्र, वामन ढाबा ते तिवरी फाटा नायगाव पूर्व तसेच वसई ईस्ट-वेस्ट ब्रिज ते मधुबन, वसंत नगरी गेट, एव्हरशाईन वसई पूर्व या प्रमुख मार्गांची पाहणी केली.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या रस्त्याच्या दुरुस्ती कामांची पाहणीदरम्यान आमदार दुबे यांनी वसईत पहाटेपर्यंत सुरु असलेल्या नाईट लाईफच्या धिंगाण्याचा पर्दाफाश केला. वसईतील दत्तानी मॉल मधे ‘विंग्स ऑन फायर’ आणि ‘पंखा फास्ट’ हे बार अडीच वाजता पोलिसांच्या नाकावर टिच्चून, कायदा मोडून सुरू असल्याचे आमदारांच्या निदर्शनास आले.

शिवाय येथे मोठ्या आवाजात डिजे वाजवला जात असल्याने स्थानिक नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतरही वसई पोलिसांकडून कोणतीच कारवाई केली जात नसल्याने आमदार दुबे यांनी संताप व्यक्त केला. तर, मॉलबाहेर तरुणांकडून मद्यप्राशन करून भांडण सुरू असल्याचे दिसून आहे. त्यानंतर आमदारदुबे यांनी परिसरात उपस्थित असलेल्या पोलिसांना देखील चांगलेच फैलावर धरले. तसेच संबंधित पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तात्काळ घटनास्थळी बोलावून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

Related Articles

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa