मनोरंजन

ब्रेकिंग! सलमान खानच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपींना जामीन

  • बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या पनवेलमधील फार्महाऊसमध्ये 2024 मध्ये दोन लोकांनी जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली होती. 
  • या दोन्ही आरोपींना पोलिसांनी सलमानच्या फार्महाऊसवर हल्ला करण्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. मात्र, अशातच आता या दोन्ही आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 
  • ज्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, सलमानच्या फार्महाऊसवर हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या दोन आरोपींविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे सापडलेले नाहीत. ज्यामध्ये कोर्टाच्या म्हणण्यांनुसार, सलमानच्या फार्महाऊसवर हल्ला करण्याचा कट ज्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये रचला गेला होता, त्या ग्रुपमधील आरोपींच्या उपस्थितीशिवाय त्यांच्याविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे सापडले नाहीत. दरम्यान सलमानच्या पनवेल येथील फार्महाऊसवरील हल्लाचा कथित कट रचणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. ज्यामध्ये आरोपी वासपी महमूद खान उर्फ वसीम चिकना आणि गौरव विनोद भाटिया उर्फ संदीप बिश्नोई यांना अटक करण्यात आली होती. 

Related Articles

Back to top button