ब्रेकिंग! वाह रे, दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा
वाह रे, दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा, असे म्हणत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भुजबळ यांनी येवल्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजितदादा यांच्यावर टीका करत कार्यकर्त्यांसमोर आपल्या कार्याचा लेखाजोखाच मांडला आहे.
भुजबळ यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार अशी चर्चा असतानाच त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने छगन भुजबळ नाराज झाले असून नागपूरचे हिवाळी अधिवेशन सोडून ते थेट नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.
आठ दिवसांपूर्वी समीर भुजबळ यांना पटेल, तटकरे यांनी बोलवले. नितीन पाटील यांचा राजीनामा घेवून भुजबळ साहेबांना राज्यसभेवर पाठवू, असे सांगितले. मकरंद पाटील यांना मंत्रिपद द्यायचे अन् त्याच्या भावाला खाली बोलवायचे. हा काय पोरखेळ आहे का? लोकांनी मला निवडून दिले आहे, त्यांना मी काय तोंड देवू. त्यांना भुजबळांचा बळी घ्यायचा होता का? भुजबळ काय लल्लू पाटील आहे का? हा काही पोरखेळ आहे का? माझ्या मनात मंत्री पदाची शंका होती, अन् त्याप्रमाणे झाले आहे. माझी जर किंमत होत नसेल तर काय उपयोग? दादाचा वादा. वाह रे दादाचा वादा, कसला वादा, अन् कसला दादा, असे म्हणत भुजबळ यांनी संताप व्यक्त केला आहे.