सोलापूर

शिंदे-फडणवीसांना अडकवण्याचा डाव?

  • विधान परिषदेच्या दुसऱ्या दिवशी आज भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या ऑडिओ क्लिपवरून एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. दरेकर यांनी आज तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याचा आयुक्त संजय पांडे यांच्याकडून प्रयत्न झाला, असे म्हणत एक ऑडिओ क्लिप सभागृहात आज सादर केली. फडणवीस आणि शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अटक करून त्यांना अडचणीत आणण्याचा डाव होता. त्यामुळे या प्रकरणी एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी देरकर यांनी केली. तसेच तत्कालीन डीसीपी लक्ष्मीकांत पाटील यांचे निलंबन करावे, असेही त्यांनी म्हटले. याप्रकरणी मंत्री शंभूराज देसाई यांनी दरेकरांची एसआयटी चौकशीची मागणी मान्य केली आहे.
  • दरेकर म्हणाले की, एक स्टिंग ऑपरेशन समोर आले आहे. तत्कालीन सरकारच्या आदेशानुसार तत्कालीन विरोधी पक्षनेते फडणवीस आणि नगरविकास मंत्री शिंदे यांना अटक करण्याचे षडयंत्र बाहेर आले आहे. आज ते सरकारच्या निदर्शनास आणून देत आहे. जो जबाब यामध्ये समोर आला, त्यात फडणवीस आणि शिंदे यांना अडकवण्याची जबाबदारी डीसीपी लक्ष्मीकांत पाटील यांना दिली होती. संजय पुनामिया यांचा जबाब वाचून दाखवतो, असे म्हणत दरेकर म्हणाले की, शिंदे आणि फडणवीस हे टार्गेट होते. त्यासंदर्भातील व्हिडीओ समोर आले आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिंदे यांचे वर्चस्व वाढत होते. म्हणून सूडबुद्धीने त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला गेला, असा गंभीर आरोप दरेकर यांनी केला आहे.
  • दरम्यान, मंत्री देसाई यांनी दरेकरांची एसआयटी चौकशीची मागणी मान्य केली आहे. तसेच पोलीस अधिकारी ओडिसी क्लिप प्रकरणात जेष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षेखाली एसआयटी चौकशी घोषणा त्यांनी सभागृहात केली. 

Related Articles

Back to top button