महाराष्ट्र

मोठी घडामोड! भाजप नितीन गडकरीसह या खासदारांना बजवणार नोटीस

  • लोकसभेत आज वन नेशन वन इलेक्शनचे विधेयक मांडण्यात आले. यावेळी सभागृहात अनुपस्थित राहिलेल्या खासदारांना भाजपने नोटीस पाठवली आहे. भाजपचे 20 पेक्षा जास्त खासदार आज सभागृहात ‘वन नेशन वन इलेक्शन’चे विधेयक मांडताना गैरहजर होते. विशेष म्हणजे आज सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हिप जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे आता या 20 खासदारांची धाकधूक वाढल्याची चर्चा आहे. 
  • आज गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नितिन गडकरी शांतनू ठाकूर, जगदंबिका पाल, बी वाई राघवेंद्र, गिरिराज सिंह, ज्योतिरादित्य सिंधिया, विजय बघेल, उदयराज भोंसले, भागीरथ चौधरी, जगन्नाथ सरकार आणि जयंत कुमार रॉय यांचा समावेश आहे.

Related Articles

Back to top button