महाराष्ट्र
ब्रेकिंग! भाजपची नवी खेळी
- महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडून दोन दिवस झाले. मात्र अद्यापदेखील खातेवाटप जाहीर झालेले नाही. खातेवाटपावरून शिवसेना आणि अजितदादा पवार गटामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. या दरम्यान भाजप एकनाथ शिंदेंना अजून एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत. विधानपरिषद सभापतीपद भाजप आपल्याकडे घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांचा पत्ता कट होण्याची चिन्हे आहेत.
- महायुती सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे. याच अधिवेशनामध्ये विधानपरिषद सभापती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.
- मागील दोन वर्षांपासून हे पद रिक्त आहे. त्यामुळे सभापती कोण होणार अशी चर्चा रंगली आहे. महायुतीमध्ये भाजप हा मोठा भाऊ आहे. त्यामुळे आता सभापतीपदासाठी राम शिंदे यांचे नाव समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राम शिंदे यांचा अवघ्या काही मतांनी पराभव झाला होता.
- दरम्यान सभापतीपद हे रामराजे निंबाळकर यांच्याकडे होते. निंबाळकर पायउतार झाल्यानंतर पद रिक्त आहे. त्याच दरम्यान उपसभापती गोऱ्हे यांनी कार्यभार पाहिला.
- आता सभापतीसाठी भाजप आग्रही आहे. भाजपकडे सर्वाधिक जागा आहे. त्यामुळे दोन्ही सभागृहामध्ये आपलाच सभापती असावा, असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.