क्राईम

निर्दयी आईनेच विकले सव्वा महिन्याच्या बाळाला

  1. नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. माटुंगा पोलिसांनी बालकांची विक्री करणाऱ्या दलालासह एकूण आठ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी ११ डिसेंबर रोजी प्रमिला उत्तप्पा पवार या महिलेने माटुंगा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून आठ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. सुलोचना सुरेश कांबळे (वय-४५ वर्षे), मिरा राजाराम यादव (वय-४० वर्षे), योगेश सुरेश भोईर (वय-३७ वर्षे) रोशनी सोनटु घोष (वय-३४ वर्षे ), संध्या अर्जुन राजपुत (वय-४८ वर्षे), मदिना उर्फ मुन्नी इमाम चव्हाण (वय-४४ वर्षे), तैनाज शाहिन चौहान (वय-१९ वर्षे), बेबी मोईनुद्यीन तांबोळी (वय-५० वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
  2. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रमिला हिची सून मनीषा यादव हिने नुकत्याच जन्माला आलेल्या सव्वा महिन्याच्या मुलीला बेंगलोर येथे विकल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून आठ आरोपींना ताब्यात घेतले असून सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने १९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button