महाराष्ट्र
लाडकी बहीण योजनेबाबत उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
- हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. लाडकी बहीण योजना सरकारने मतांसाठी निवडणुकी आधी जाहीर केली होती. निवडणूक आयोगाच्या मदतीने त्यांनी निवडणुकी दरम्यान त्यावर स्थगिती आणली. आता आचारसंहिता संपली आहे. नवे सरकार ही आले आहे. त्यामुळे मागील सर्व महिन्यांच्या बॅकलॉगसह बहिणींच्या खात्यात पैसे तातडीने जमा करावेत, अशी मागणी ठाकरे यांनी केली. आता या योजनेत आवडती बहीण, नावडती बहीण असा भेद करू नये, असे ठाकरे म्हणाले.
- या सरकारला आमच्या शुभेच्छा आहेत. नाईलाजाने आता या सरकारकडे जनतेच्या अपेक्षा आहेत. निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली. निवडणुकी आधी पाच महिन्यांचे पैसे बहीणींच्या खात्यात जमा केले आहेत. महायुतीने निवडणुकीनंतर 2100 रूपये देणार, असे आश्वासन दिले होते. हे पैसे तातडीने बहीणींच्या खात्यात जमा करावेत. आता कोणतेही निकष लावू नयेत. जसे सरसकट सर्वांना आधी पैसे देण्यात आले तसेच आताही देण्यात यावेत. आवडती आणि नावडती बहीण असा भेदभाव करू नये, असेही ठाकरे म्हणाले.