राजकीय

ब्रेकिंग! नाराज भुजबळांना भाजपमध्ये घेणार?

अलिकडे मंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना स्थान न देण्यात आल्याने नाराजी नाट्याला सुरूवात झाली आहे. भुजबळांच्या नाराजी नाट्यात ते भाजपात प्रवेश करू शकतात, अशीही चर्चा होती. मात्र, आता याबाबत मोठी अपडेट समोर आली असून, भुजबळांना तुर्तास तरी भाजपमध्ये घेतले जाणार नसल्याचे सांगितले जात आहे. महायुतीत वाद नको म्हणून भुजबळांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर तिन्ही पक्षातील अनेक नेते नाराज झाले असून यात वरिष्ठ नेते असलेल्या भाजपच्या सुधीर मुनगंटीवार आणि राष्ट्रवादीच्या भुजबळांचा पत्ता कट करण्यात आला आहे.
यानंतर नाराज भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीदेखील भेट घेतली होती. पत्ता कट करण्यात आलेल्या नेत्यांचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी एकीकडे होत आहे. एक मोठा ओबीसी नेता म्हणून भुजबळांची ओळख असून भुजबळांना जर भाजपमध्ये घेतले तर अजितदादांच्या राष्ट्रवादीत नाराजीचा सूर उमटला जाऊ शकतो. त्यामुळे वादाची ठिणगी पडू शकते. हे वाद टाळण्यासाठी तुर्तास तरी भुजबळांना भाजपमध्ये तुर्तास तरी प्रवेश दिला जाणार नसल्याचे सांगितले जात आहे.

Related Articles

Back to top button