कार-बाईकच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघे ठार

कार आणि बाईकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना पुणे जिल्यातील जुन्नर तालुक्यातील सीतेवाडी गावच्या हद्दीत अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर सीतेवाडी फाट्याजवळ काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
या अपघात निलेश ज्ञानेश्वर कुटे (वय-४०), जयश्री निलेश कुटे (वय-३५), सान्वी निलेश कुटे (वय-१४, सर्व रा. पिंपरीपेंढार, साळशेत, ता. जुन्नर) अशी ठार झालेल्या एकाच कुटुंबातील व्यक्तीची नावे आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, निलेश हे काल पिंपरीपेंढार येथून दुचाकी क्रमांक एम एच ०५ बी एक्स ४८२४ वरून कल्याण बाजूकडे जात होते. यावेळी कल्याण बाजूकडून अहिल्यानगरकडे येणारी कार एम. एच. १६ एटी ०७१५ यांची समोरासमोर जोरदार धडक होऊन दुचाकीवरील निलेश, त्यांची पत्नी जयश्री व मुलगी सान्वी हे तीन जण ठार झाले.