क्राईम

ब्रेकिंग! वाल्मिक कराडचा एन्काऊंटर होऊ शकतो

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. एकीकडे सीआयडी तपास सुरू असताना आता राजकीय वर्तुळात देखील विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. संपूर्ण राज्याचे लक्ष वाल्मिक कराड यांच्या अटकेवर असताना आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी धक्कादायक दावा केला आहे. वाल्मिकचे एन्काऊंटर होऊ शकतो, असे वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.

पोलीस स्टेशनमध्ये बेड घेऊन गेलेत, यापूर्वीच असे कधी झाले नाही. हे कोणाचे लाड आहेत, वाल्मिकचे लाड पुरवले जात आहेत, यावर चौकशी झाली पाहिजे. मोठया आकाला वाचवण्यासाठी या लहान आका कराडचा एन्काऊंटर होऊ शकतो. एका जवळच्या उच्चपदस्थ अधिकारी खात्रीलायक माहिती दिली, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button