क्राईम

कोण आहे वाल्मिक कराड? शरण आल्यानंतर राजकीय भूकंप

काही दिवसांपूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचे राज्यभरात संतप्त पडसाद उमटले होते. या घटनेच्या निषेधार्थ बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चाही निघाला होता. या घडामोडीनंतर आज एक आणखी मोठी घडामोड घडली. फरार असलेला वाल्मिक कराड आज सीआयडीला शरण आला. त्यानंतर पुढे काय होणार याची चर्चा सुरू झाली आहे.

वाल्मिक याचे दहावीपर्यंत शिक्षण गावात पूर्ण झालं. यानंतर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी तो परळीला गेला. यादरम्यान परळीतील शिवाजी महाराज चौकात पहिल्यांदा भगवान बाबा मंडळ स्थापन करून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. यानिमित्ताने त्याने परळीत जम बसवला. 1990 चा काळ भाजपचा. राज्यात माधव पॅटर्न राबवण्यासाठी महत्त्वाचा काळ होता. या काळात गोपीनाथ मुंडेंच्या हाताखाली राजकारण करायला सुरुवात केली.

मुंडे या काळात वंजारी समाजाचे नेते म्हणून उदयास येत होते. मुंडे विधानभवन आणि ग्राऊंड लेव्हलला गाजत होते. अनेक तरुण त्यांच्याकडे आकर्षित होत होते. यामध्ये वंजारी समाजातून येणारा वाल्मिक हादेखील होता.

वाल्मिक हा परळी नगरपरिषदेचा नगराध्यक्ष राहिला आहे. जिल्हा नियोजन समितीचा सदस्य आहे. धनंजय मुंडे यांचा तो निकटवर्तीय आहे. धनंजय यांच्या अनुपस्थितीत मतदारसंघातील सर्व कामे वाल्मिकच पाहतो. सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित पवनचक्की अधिकाऱ्याकडे खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल आहे. देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटे प्रमुख आरोपी आहे, तो वाल्मिकचा निकटवर्तीय आहे.

Related Articles

Back to top button