क्राईम

ब्रेकिंग! पुरावे नष्ट करूनच वाल्मिक कराडने सरेंडर केले?

काही दिवसांपूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचे राज्यभरात संतप्त पडसाद उमटले होते. या घटनेच्या निषेधार्थ बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चाही निघाला होता. या घडामोडीनंतर आज एक आणखी मोठी घडामोड घडली.

फरार असलेला वाल्मिक कराड आज सीआयडीला शरण आला. यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. वाल्मिकवर जर खंडणीचा गुन्हा होता तर त्याने याआधीच आत्मसमर्पण करायला हवे होते, असे सोनवणे म्हणाले.

दुसरीकडे याच मुद्यावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवत या प्रकरणावर संशय व्यक्त केला आहे. पुरावे नष्ट केल्यावर वाल्मिक कराडने सरेंडर केले का? असा सवाल करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यावर संशय व्यक्त केला आहे.

खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर 22 दिवस पोलीस, सीआयडी वाल्मिकला पकडू शकले नाहीत. इतकेच नाही तर आज सरेंडर होताना वाल्मिक हा स्वतःच्या गाडीतून येतो. महाराष्ट्र पोलीस आणि गृहखात्याचे याहून मोठे अपयश असू शकत नाही. इतके दिवस वाल्मिकला लपायला कोणी मदत केली? कोणाच्या संपर्कात तो होता? कोणाच्या सांगण्यावरून आज सरेंडर झाले, या सगळ्यांचे सत्य समोर आले पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणाले.

Related Articles

Back to top button