देशभरातील जवळपास 80 कोटी लोकांना मोफत रेशनचा फायदा होत आहे. त्याचबरोबर या योजनेचा गैरफायदा घेणारेही अनेक लोक आहेत. पात्रता नसतानाही त्यांना रेशन मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. पात्रतेशिवाय रेशन घेणाऱ्यांची शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
बनावट शिधापत्रिका वापरून पात्रतेशिवाय मोफत रेशन मिळवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने एक जानेवारीपासून मुदत निश्चित केली आहे. नवीन वर्षापासून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा लोकांची ओळख ई-केवायसी आणि इतर पद्धतींद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे एक जानेवारीपासून काही बनावट शिधापत्रिका बंद होऊ शकतात.