युवा ऑस्ट्रेलियन फलंदाज विराटशी नडला! धक्काबुक्की झाली
टीम इंडिया आणि आस्ट्रेलियात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडियाचा क्रिकेटस्टार विराट कोहली आणि युवा ऑस्ट्रेलियन फलंदाज सॅम कॉन्स्टास यांच्यात जोरदार वाद झाला. या सामन्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यावर चाहतेही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
विराट आणि ऑस्ट्रेलियन पदार्पण करणारा कॉन्स्टास यांच्यात बाजू बदलताना खांद्याला खांदा भिडल्यानंतर जोरदार बाचाबाची झाली. दोन्ही क्रिकेटपटूंमध्ये नेमके कोणते संभाषण झाले ते कळू शकले नाही, मात्र काही सेकंदातच कॉन्स्टेसचा बॅटींग पार्टनर उस्मान ख्वाजा आणि पंच यांनी मध्यस्थी करून वाढता वाद शांत केला. मैदानातील या राड्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये ते दोघे एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहेत. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर टीम इंडियाविरुद्ध सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करून कॉन्स्टासने आज इतिहासात आपले नाव नोंदवले. कॉन्स्टास 65 चेंडूत 60 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.