सोलापूर
सोलापूर शहरात नंदीध्वज पूजेचा उत्साह शिगेला
- सोलापूर- ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील योगदंडाचे प्रतीक असलेले नंदीध्वज पेलण्याचा सराव शहरात सुरु असुन ‘बोला …बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र, श्री सिद्धारामेश्वर महाराज की जय’ अशा घोषणा देत भक्तिमय, आनंददायी आणि मंगलमयी वातावरणात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत तिसऱ्या नंदीध्वजांचे पूजन भवानी पेठ येथील गीताधाम सोसायटी येथे मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले.
- प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील तिसरे नंदीध्वजाचे पूजन आनंद गिडवीर दाम्पत्य यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. नंदीध्वजाला आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले होते. यावेळी नंदीध्वजांचे विधिवत पूजन करून महाआरती करण्यात आली.
- जगदिश स्वामी व मनोहर स्वामी यांनी मंत्रोच्चाराचे पठण केले.
- यात्रेच्या अगोदर आपल्या घरी नंदीध्वज पूजनासाठी यावेत अशी अनेक भक्तांची इच्छा असते. सोलापूर शहर परिसरात हे नंदीध्वज पूजनासाठी घेऊन जातानाचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. यावेळी तिसऱ्या नंदीध्वजाचे मास्तर नागनाथ राजमाने, महादेव तोडकर शन्मुख स्वामी, यशवंत सिदंगी, तम्मा तोडकर, परमेश्वर ख्याडे, बसवराज हिरापुरे, जगदीश ख्याडे, चंदन बिराजदार, अमोल कस्तुरे, सिद्धाराम स्वामी, गणेश शिंपी उपस्थित होते.
- श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा ही आनंदाची पर्वणी असते. यंदा आम्ही नंदीध्वजाला १०८ रुद्राक्षचे एकुण ६० माळा तयार केल्या होत्या. यामध्ये नंदीध्वजाला ७ हजार रुद्राक्षांच्या माळा अर्पण करून सजावट करण्यात आले होते. दरवर्षी नंदीध्वज पूजन केल्याने मनोमन आनंद होते.
- आनंद गिडवीर,
- श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड व्यापारी.