क्राईम

ब्रेकिंग! सतीश वाघ खून प्रकरणात बायकोच मास्टरमाईंड

पुण्यातील हॉटेल व्यावसायिक व सतिश वाघ यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली. वाघ यांच्या हत्येची सुपारी त्यांचीच पत्नी मोहिनी वाघ हिने दिल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. या हत्येप्रकरणी

मोहिनीला पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

भाजपचे विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश हे व्यावसायिक होते. 9 डिसेंबर रोजी ते मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. या दरम्यान, ब्लू बेरी हॉटेलच्या बाहेर चारचाकी वाहनातून आलेल्या चौघांनी त्यांना जबरदस्ती गाडीत बसवून त्याचे अपहरण केले होते. ही अपहरणाची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाघ यांच्या अपहरणानंतर लगेच त्याच गाडीत चाकूने भोसकून त्यांची हत्या केल्याची घटना समोर आली होती. या अपहरणाने राज्यात खळबळ उडाली होती.

हत्येनंतर 16 दिवसांनी हत्येचे खरे कारण समोर आले. प्रेमप्रकरणातून पत्नीनेच वाघ यांची पाच लाखांची सुपारी देऊन हत्या घडवून आणली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या गुन्ह्याची उकल केली. वाघ यांना मारण्यासाठी मोहिनीने पाच लाख रुपयांची सुपारी हत्या घडवून आणल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.

शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबत मोहिनी यांचे प्रकरण होते. या प्रेम प्रकरणात सतीश वाघ आडवे येत असल्याने त्यांना पाच लाखाची सुपारी देऊन संपवण्यात आले आहे. याबाबतची कबुली मोहिनी यांनी पोलिसांकडे दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे.

Related Articles

Back to top button