सोलापूर

ब्रेकिंग! दहा लाखासाठी…

  • सोलापूर : माहेरून दहा लाख रुपये आणून दे म्हणत विवाहितेला वारंवार मानसिक व शारीरिक छळ केल्याची घटना 22 मार्च 2019 ते 22 ऑक्टोबर 2024 पर्यंत विवाहितेच्या सासरी घडली. याप्रकरणी सायली प्रीतम वाडेकर (वय-34, रा.स्वामी विवेकानंद नगर, हत्तुरे वस्ती, होटगी रोड) यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पती प्रीतम अनिल वाडेकर, सासू सरला अनिल वाडेकर,सासरे अनिल शांताराम वाडेकर (सर्व.रा. आंबोली, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 
  • यात अधिक माहिती अशी की, फिर्यादी या सासरी नांदताना वरील संशयित आरोपींनी फिर्यादीस वारंवार घालून पाडून बोलून अश्लील भाषेत शिवीगाळ करणे ,तू आमच्या लायकीची नाही, तुझी आम्हाला गरज नाही, आमची मुलगी ठेव व तुझ्या आईकडे जा असे म्हणायचे व आम्ही राहतो येथे आमची तुझ्यामुळे बदनामी झाली आहे. त्यामुळे आम्ही दुसरीकडे घर घेणार आहोत, आम्हाला तुझ्या आईकडून दहा लाख रुपये आणून दे, असे म्हणत शारीरिक व मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

Related Articles

Back to top button