महाराष्ट्र

ब्रेकिंग! देवेंद्र फडणवीस रचणार नवा इतिहास

  • राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर अनेक राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. अशातच आता सत्ता स्थापनेनंतर पालकमंत्रीपदांबाबत चढाओढ पाहायला मिळत आहे. 
  • अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पालकमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली आहे. 
  • फडणवीस यांनी नागपूरमध्ये एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये राजकीय मुद्द्यांना त्यांनी उत्तर दिले आहे. मात्र यावेळी फडणवीस यांना पालकमंत्रीपदाबाबत तिन्ही पक्षांमधल्या आमदारांकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांबाबत विचारणा करण्यात आली. 
  • मात्र या संदर्भात तिन्ही पक्ष मिळून निर्णय घेतील. माझी इच्छा अशी आहे की गडचिरोलीचे पालकमंत्रीपद माझ्याकडे ठेवावे. त्यामुळे त्याला तिन्ही नेत्यांची परवानगी दिली तर ते होईल, असे फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 
  • दरम्यान फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री झाल्यास या जिल्ह्याच्या विकासाला कलाटणी मिळू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. 
  • तसेच एखाद्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारणारे फडणवीस हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री असणार आहेत. दुसरीकडे अद्याप कोणत्या जिल्ह्याचे पालकत्व कोण स्वीकारणार याबाबत कोणताही निर्णय झालेल नाही. परंतु, दोन दिवसात याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे.

Related Articles

Back to top button