क्राईम

13 हजार पगार असलेल्या आरोपीने मैत्रिणीला गिफ्ट केला फोर बीएचके फ्लॅट

  • मासिक पगार फक्त १३ हजार रुपये असणाऱ्या एका सरकारी कंत्राटी कर्मचाऱ्याने तब्बल २१ कोटींचा झोल केला असल्याचे समोर आले आहे. त्याने आपल्या मैत्रिणीला चक्क फ्लॅट गिफ्ट केल्याचे आणि महागड्या गाड्यातून फिरत असल्याचे समोर आले आहे. ही ऐषआरामाची जीवनशैली पाहून त्याच्या ओळखीच्या लोकांना धक्का बसला आणि त्यांनी विचार करायला सुरुवात केली की, त्याच्याकडे एवढा पैसा कुठून आला.
  • हर्षकुमार क्षीरसागर आणि आणखी एका आरोपीने एकत्र येऊन सरकारी तिजोरीतून २१ कोटी ५९ लाख ३८ हजार रुपयांची फसवणूक केली. छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुल प्रशासनाच्या इंटरनेट बँकिंगद्वारे ही रक्कम काढण्यात आली. या रकमेचा वापर हर्षकुमारने आपल्या मैत्रिणीसाठी BMW कार, BMW बाईक आणि विमानतळाजवळ 4BHK फ्लॅट खरेदी करण्यासाठी केला. याशिवाय, त्याने शहरातील एका प्रसिद्ध ज्वेलर्सकडून हिऱ्यांनी जडलेला चष्माही बनवला होता.
  • तपासादरम्यान असेही समोर आले की या फसवणुकीत आणखी एका महिला कंत्राटी कर्मचाऱ्याच्या पतीने ३५ लाख रुपयांची एसयूव्ही खरेदी केली होती. प्राथमिक तपासात असे दिसून आले की मुख्य आरोपी हर्षकुमार ही एसयूव्ही घेऊन फरार झाला आहे. याशिवाय, क्रीडा संकुलाच्या नावावर इंडियन बँकेत खाते उघडण्यात आले होते, ज्याचा उद्देश सरकारी निधी प्राप्त करणे हा होता. बनावट कागदपत्रांचा वापर करून इंटरनेट बँकिंग सुविधा सक्रिय केल्यानंतर आरोपीने सरकारी निधी आपल्या खात्यात हस्तांतरित केला.
  • धक्कादायक बाब म्हणजे, या फसवणुकीची माहिती विभागीय उपसंचालकांना सहा महिन्यांनंतर कळाली. आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे विभागीय अधिकाऱ्यांची फसवणूक करून सरकारी निधीचा अपहार केला.

Related Articles

Back to top button