क्राईम
लग्नातच उडवा, शिंदे गट आमदाराच्या हत्येचा कट
- शिंदे गटाचे अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. ठाणे गुन्हे शाखेने अंबरनाथमधून दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. शहरातील शिवसेनेच्याच दोन जणांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. मात्र या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
- अंबरनाथ शहरात शिवसेनेत दोन गट असून याच गटबाजीतून किणीकर हे चौथ्यांदा निवडून आल्यानंतर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. किणीकर हे एका कौटुंबिक लग्न सोहळ्यासाठी लातूरला गेले आहेत. याच लग्न सोहळ्यात 26 डिसेंबर रोजी त्यांची हत्या करण्यासाठी काही शूटर्सना सुपारी देण्यात आल्याची माहिती स्वतः किणीकर यांना मिळाली होती.
- त्यानुसार त्यांनी थेट ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत ठाणे गुन्हे शाखेने अंबरनाथमधून दोन जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या चौकशीनंतर शहरातील शिवसेनेच्या दोन जणांना पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. मात्र, याबाबत अद्याप आमदार बालाजी किणीकर आणि पोलीस या दोघांनीही अधिकृतपणे काहीही बोलण्यास नकार दिला आहे.