महाराष्ट्र

लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना 2100 रूपये कधी मिळणार?

राज्यात लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळण्यास सुरूवात झाली आहे.

दरम्यान, महायुतीने जाहीरनाम्यामध्ये महिलांना हे पैसे 1500 वरून 2100 करून दिले जातील असे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता महायुतीच्या सरकार त्यांची पुन्हा नव्याने सत्ता आल्यानंतर महिलांना नेमके किती रूपये मिळणार याची उत्सुकता लागली आहे. महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. 

आगामी अर्थसंकल्पानंतर या योजनेअंतर्गत 2100 देण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल. सध्या आचारसंहिता लागल्याने स्थगित झालेला हफ्ता महिलांच्या खात्यामध्ये टाकण्याचे काम सुरू आहे. नोव्हेंबर महिन्याचा लाभ महिलांना मिळाला आहे. आता डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे, असे तटकरे यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button