महाराष्ट्र
मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली नवी खुशखबर
- आगामी दोन – तीन वर्षांत उद्योग, गृह यांसारख्या सर्वच क्षेत्रातील वीजेचे दर आपण कमी करणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. अशा प्रकारचे नियोजन ऊर्जा विभागात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आवास योजनांतंर्गत देण्यात येणाऱ्या घरांमध्ये सोलार देण्याचा प्रयत्न असल्याचे फडणवीस म्हणाले.
- फडणवीस यांनी नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारच्या विविध योजनांची तसेच सरकारचे पुढील प्लॅन काय असणार याबाबत माहिती दिली.
- वर्षानुवर्ष रखडलेले पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह कोकणातील प्रकल्प पूर्ण केले. सर्वच क्षेत्रात मोठी भरारी त्या पाच वर्षांत घेतली. त्यानंतर गेल्या अडीच वर्षांत उपमुख्यमंत्री पदाची संधी भेटल्यानंतर ऊर्जा, सिंचन, गृहनिर्माण, गृहमंत्री अशा अनेक खात्यांचे काम केले. ऊर्जा विभागाचा पुढील 25 वर्षांचा रोड मॅप आपण तयार केला आहे. पुढील 2-3 वर्षात सर्वच प्रकारचे वीजेचे दर आपण कमी करू शकतो, अशा प्रकारची व्यवस्था ऊर्जा विभागात उभी केली असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.