महाराष्ट्र
सुप्रिया सुळे यांची पलटी
- विधानसभा निवडणूक दारुण पराभव झाल्यापासून भाजपने ईव्हीएममध्ये छेडछाड करून निवडणुका जिंकल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे ही त्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. मात्र आता त्यांनी पलटी मारली असून असे आरोप करणाऱ्या काँग्रेस आणि इतर पक्षांना सुनवले आहे.
- सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, “मी ठोस पुराव्याशिवाय इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर कोणतेही आरोप करू शकत नाही. पण, इतर पक्षांनी ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा दावा केल्यामुळे या विषयावर चर्चा आवश्यक आहे. माझ्याकडे ठोस पुरावे असल्याशिवाय आरोप करणे योग्य नाही, असे मला वाटते. मी यापूर्वी चार निवडणुका ईव्हीएमद्वारे जिंकल्या आहेत.
- लोकसभा आणि विशेषतः महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपने आणि त्यांच्या मित्र पक्षांनी ईव्हीएममध्ये छेडछाड करून निवडणुका जिंकल्या आणि यातूनच एकतर्फी निकाल लागला असा आरोप विरोधक करत आहेत. काँग्रेसने हा मुद्दा जास्त ताणून धरला असून ‘इंडी’ आघाडीमधील काही घटक पक्षांनी ईव्हीएममध्ये छेडछाड होत नसल्याचे उघडपणे सांगून सुळे यांनी यातून काढता पाय घेतला आहे.