महाराष्ट्र
ब्रेकिंग! भाजप पुन्हा सुसाट
- लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. या निवडणुकीत भाजपने विरोधी पक्षांना चांगलेच मागे टाकले. अशातच आता देणग्यांमध्येही भाजपाला इलेक्टोरल ट्रस्ट आणि खाजगी कंपन्यांच्या देणग्यांमधून तब्बल 2244 कोटी रुपये मिळाले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी तिप्पट देणगी मिळाली आहे.
- तर दुसरीकडे काँग्रेसला यंदाच्या वर्षी 289 कोटी रुपये मिळाले असून मागील वर्षी काँग्रेसला 79.9 कोटी रुपये मिळाले होते. भाजपाआणि काँग्रेस या दोघांना प्रुफंड इलेक्टोरल ट्रस्टकडून सर्वाधिक देणग्या मिळाल्या आहेत. भाजपाला 723 कोटी तर काँग्रेसला 156 कोटी रुपये दिले आहेत. 2023-24 मध्ये भाजपाच्या देणग्यांपैकी जवळजवळ एक तृतीयांश देणगी आणि काँग्रेसच्या निम्म्यापेक्षा अधिक देणग्या प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्टकडून आल्या आहेत. 2023-24 मध्ये भाजपाला सर्वाधिक 2,244 कोटी रुपयांची देणगी मिळाली, तर तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा पक्ष BRS दुसऱ्या क्रमांकावर असून बीआरएसला 580 कोटी रुपयांची देणगी मिळाली, तर काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेसला 289 रुपयांची देणगी मिळाली आहे.
- 2022-23 मध्ये प्रुडंटला सर्वाधिक देणग्या देणाऱ्या संस्थांमध्ये मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रा लिमिटेड, सीरम इन्स्टिट्यूट, आर्सेलर मित्तल ग्रुप आणि भारती एअरटेल यांचा समावेश आहे.