क्राईम

त्याने अकरा जणांना लिफ्ट दिली, सर्वांची हत्या केली आणि..

अठरा महिन्यांच्या कालावधीत अकरा जणांची हत्या करणाऱ्या सिरियल किलरला अखेर पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. राम स्वरुप (33 वर्ष) असे या आरोपीचे नाव आहे. तो होशियारपूर जिल्ह्यातल्या चौरा जिल्ह्यातली रहिवाशी आहे. त्याला काल रुपनगर जिल्ह्यातून अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वरुपने सर्व पुरुषांची हत्या केली आहे. या सर्वांसोबत त्याने लैंगिक कृत्य केली होती. स्वरुपने या सर्वांना लिफ्ट दिली होती. त्यानंतर त्यांच्याकडे पैसे मागितले. संबंधित व्यक्तीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर स्वरुपने त्यांची हत्या केली, अशी माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली. या प्रकरणातील बहुतेक खटल्यात आरोपीनं पीडितांना कपड्याच्या तुकड्याने गळा कापला. तर काही प्रकरणात पीडित त्यांना डोक्याला झालेल्या दुखापतीमध्ये मृत्यू पावले, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

एका प्रकरणात स्वरुपने हत्या केल्यानंतर मृत व्यक्तीच्या पाठीवर धोकेबाज असे लिहिले होते. त्याने खासगी कारखान्यात काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाची हत्या केल्यानंतर त्याच्या पाठीवर धोकेबाज असे लिहिले होते.

स्वरुपला सुरुवातीला एका 37 वर्षांच्या तरुणाच्या हत्ये प्रकरणात अटक करण्यात आली होती. मृत व्यक्ती मोद्रामधील टोल प्लाझाजवळ चहा आणि पाणी विकत असे. या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये स्वरुपने आणखी दहा जणांची हत्या केल्याची कबुली दिली. त्यामधील पाच हत्येची पृष्टी अद्याप झाली आहे. अन्य प्रकरणाचा तपास सुरु आहे. रुपनगर, होशियारपूर आणि फत्तेनगर या तीन जिल्ह्यातील व्यक्तींची स्वरुपने हत्या केली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मजुरीचे काम करत होता. त्याला ड्रग्जचे व्यसन होते. या सीरियल किलरने दिलेल्या माहितीनुसार, तो हत्या केल्यानंतर त्या व्यक्तीच्या पाया पडून त्यांच्याकडे केलेल्या गुन्ह्याची माफी मागत असे. आपण हे सर्व कृत्य नशेत केली आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल आपल्याला काही आठवत नसल्याचे स्वरुपने सांगितले.

दरम्यान आरोपी विवाहित असून त्याला तीन मुले आहेत. पण, त्याचे व्यसन आणि समलैंगिकतेमुळे दोन वर्षांपूर्वी कुटुंबीयांनी त्याच्याशी नाते तोडले होते. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button