सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांची बदनामी करणाऱ्यांची खैर नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बदनामीकारक पोस्ट्स करण्याच्या प्रकरणात राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. या प्रकरणात सायबर गुन्ह्याच्या अधिनियमांतर्गत 12 सोशल मीडिया प्रोफाइल्सविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आली आहे.
सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर फडणवीस यांच्याविरुद्ध खोटे आणि बदनामीकारक व्हिडीओस आणि पोस्ट्स शेअर करणारे बारा सोशल मीडिया यूजर्सविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या प्रोफाइल्सने फडणवीस यांच्या प्रतिमेला धोका पोहोचवणारे आणि त्यांची प्रतिष्ठा धोक्यात आणणारे व्हिडीओ पोस्ट केले होते. पोलिसांनी भाजपच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
या प्रकरणात महाराष्ट्र सायबर सेलने लक्ष घातले आहे आणि संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना नोटिस पाठवली आहे. या नोटिसांमध्ये त्यांना बदनामीकारक पोस्ट तात्काळ काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारच्या या पावलामुळे सोशल मीडियावरून होणारी बदनामी आणि खोट्या बातम्यांवर आळा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.