- अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळविला. महायुतीच्या या विजयात लाडकी बहीण योजनेचा वाटा मोलाचा ठरला. सध्या सोलापूरसह अन्य भागात या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, महाराष्ट्रानंतर दिल्लीमध्येही लाडकी बहीण योजना सुरू होणार असल्याच्या बातम्या गेल्या आठवड्यात झळकल्या होत्या. नवी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महिला सन्मान योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला दर महिना २१०० रूपये देण्याचे जाहीर केल्याच्या बातम्या आल्या होत्या. या योजनेबाबत दिल्ली सरकारची एक जाहिरात पुढे आली आहे. दिल्ली सरकारने वर्तमानपत्रात दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात अशा पद्धतीची कोणताही योजना नसल्याचे म्हटले आहे.
- महिला सन्मान योजनेबाबत दिल्ली सरकारची एक जाहिरात समोर आली आहे. दिल्ली सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाने आपल्या जाहिरातीत म्हटलेय की, मीडिया रिपोर्ट्स आणि सोशल मीडियावरील पोस्ट्समधून कळले की, एका राजकीय पक्षाने दिल्लीतील महिलांना मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेअंतर्गत दर महिन्याला २१०० रुपये देण्याचा दावा केला. पण दिल्ली सरकारकडून अशा कोणत्याही योजनेची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
- दिल्ली सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाने आज अनेक वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देत स्पष्टीकरण दिले आहे. जर कधी अशी कोणतीही योजना दिल्ली सरकार आणणार असेल, तर त अधिसूचित केली जाईल. महिला आणि बालविकास विभाग, दिल्ली सरकार त्यासाठी एक डिजिटल पोर्टल लॉन्च करेल. पात्रतेनुसार सर्वांना त्यात अर्ज भरता येतील. पात्रतेच्या अटी आणि प्रक्रियेबद्दल विभाग वेळोवेळी स्पष्ट सूचना देईल. विभागाच्या सर्व योजनांची माहिती फक्त विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- पण महिला सन्मान योजना अस्तित्वातच नाही. त्यामुळे या नसलेल्या योजनेअंतर्गत नोंदणीसाठी फॉर्म/अर्ज स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही. कोणताही खासगी व्यक्ती किंवा राजकीय पक्ष जो या योजनेच्या नावाखाली फॉर्म/अर्ज गोळा करत आहे. अथवा अर्जदारांची माहिती घेत आहे, तो फसवणूक करत आहे.
ब्रेकिंग! लाडकी बहीण योजना बंद?
