सोलापूर

मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायला नराधमाला बायकोनेच केली मदत

  • अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन हत्या केल्याप्रकरणी कल्याणमधील प्रमुख आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुख्य आरोपी विशाल गवळीला पोलिसांनी अटक केली आहे. विशालच्या पत्नीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान आरोपीच्या पत्नीने पोलिसांसमोर धक्कादायक खुलासे केले आहेत.
  • शेगाव येथून पोलीस पथकाने आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, विशाल पत्नीच्या गावी लपून बसला होता. पत्नीच्या गावातून शेगाव येथून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
  • अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी विशाल याची पत्नी साक्षीने सांगितले की, मुलीला सायंकाळी पाच वाजता घरात घेतले. त्यावेळी विशालने मुलीसोबत गैरकृत्य करून हत्या केली. त्यानंतर एका मोठ्या बॅगमध्ये मुलीचा मृतदेह टाकून ठेवला होता. आरोपीची पत्नी बँकेत नोकरी करत असल्याने संध्याकाळी सात वाजता घरी आली.
  • त्यावेळी विशालने पत्नीला घडलेला सर्व प्रकार सांगितला. हे ऐकून तिला धक्काच बसला. मात्र नंतर दोघे पती-पत्नी एकत्र बसून मृतदेहाचे काय करायचे, याबद्दल योजना आखली. त्याआधी घरातील रक्त दोघांनी पुसून टाकले. 
  • रात्री साडे आठ वाजता मित्राची रिक्षा विशालने बोलावून घेतली. नऊ वाजता बापगावच्या दिशेने रवाना झाले. तिथे मृतदेह फेकून दोघे घरी परतले. घरी परतत असताना विशालने आधारवाडी चौकातून दारू विकत घेतली आणि तेथून आपल्या पत्नीच्या गावी बुलढाणा येथे निघून गेला. पत्नी साक्षी मात्र येथेच राहिली. मात्र, घराजवळ सापडलेल्या रक्तामुळे विशाल याने हे कृत्य केल्याचा संशय आला. पोलिसांनी साक्षीला ताब्यात घेत चौकशी केली आणि तिने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.

Related Articles

Back to top button