देश - विदेश
राहुल गांधी भाजी मंडईत पोहोचले
- लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात राहाण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी रोज नवनवे प्रयोग करताना दिसतात. आज काहीसा असाच एक प्रयोग करत दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत राहुल गांधी भाजी खरेदी करण्यासाठी भाजी मंडईत पोहोचले. भाजी खरेदीसाठी आलेल्या राहुल गांधींना भाज्यांचे गगनाला भिडलेले भाव ऐकून धक्काच बसला.
- खुद्द राहुल यांनी भाजी मंडईचा व्हिडिओ X सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. ज्यामध्ये ते महिलांसोबत दिल्लीच्या गिरीनगर भाजी मंडईत दुकानदारांसोबत भाजी खरेदी करताना दिसत आहे. राहुल गांधी यांनी हा व्हिडीओ आपल्या सोशल मिडीया अंकाऊंटवर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले की- एकेकाळी लसूण चाळीस रुपये प्रति किलो होता, आज चारशे रुपये प्रति किलो झाले आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे स्वयंपाकघराचे बजेट बिघडले – सरकार कुंभकरणासारखे झोपले!
- भाजी मंडईत लसणाचा भाव चारशे रुपये किलो आहे, हे ऐकून राहुल गांधी भाजी विक्रेत्याकडे टक लावून पाहत आहेत. दरम्यान, कोबी, वाटाणा, कांदा आणि बटाटे या हंगामी भाज्यांच्या वाढलेल्या किमतींमुळे राहुल गांधी चिंतेत दिसले.