सोलापूर

ब्रेकिंग! भावाच्या मुलीला बघितल्याच्या कारणावरून सोलापुरात राडा

  • सोलापूर (प्रतिनिधी) भावाच्या मुलीला का बघितला या कारणावरून तरूणास लाथा बुक्क्यांनी मारहाण करून दुखापत केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २२ डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पाथरूड चौक येथे घडली. याप्रकरणी अजय राजू अडसुळे (वय-२९,रा.न्यू पाच्छा) यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
  • त्यांच्या फिर्यादीवरून तुषार मल्हारी शिंदे व सौदागर क्षीरसागर (रा.सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
  • याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे ओम मेडिकल समोर फरशीच्या कट्ट्यावर बसलेले असताना तुषार शिंदे याने भावाच्या मुलीला का बघितला या कारणावरून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच सौदागर क्षीरसागर याने देखील लोखंडी पाईपने छातीवर, पायावर मारून फिर्यादीला दुखापत करून दुचाकीवर बसवून वालचंद कॉलेजच्या गेट समोर घेऊन जाऊन पुन्हा तेथे लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस हवलदार शेख हे करीत आहे.

Related Articles

Back to top button