क्राईम
महाराष्ट्राला हादरवणारा खुलासा समोर
- मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुळे हत्याकांडामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासकीय परिस्थिती सध्या चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर, बीडचे माजी जिल्हाधिकारी सदानंद कोचे यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे जो राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ माजवणारा आहे.
- कोचे यांनी एका मुलाखतीत बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की बीड जिल्ह्यात गुन्हेगारी आणि खंडणीप्रकरणे वाढत आहेत, ज्यामुळे सामान्य नागरिकांचं जीवन अत्यंत कठीण झालं आहे. बीड हे बिहारपेक्षा वाईटच आहे. हे 2011 ला मला सांगण्यात आलेलं. माझ्या काळात दर एक दोन दिवसाला खून होणार, बलात्कार रोज होणार आणि हाणामारीही रोजच. त्याला काही मर्यादा नाही. एक IPS अधिकारी तर बदली झाल्यानंतर महिन्याभरातच गायब झालेले. ते अजूनपर्यंत सापडलेले नाहीत, अशी खुलासा कोचे यांनी केला.