क्राईम

संतोष देशमुखांची हत्या का झाली? फडणवीसांनी सांगितला क्षण अन् क्षण

  • बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आज दुसऱ्या दिवशीही हिवाळी अधिवेशनात चांगलेच गाजले. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. या प्रकरणातील जो कोणी मास्टरमाईंड असेल त्याच्या लवकरच मुसक्या आवळण्याचे आश्वासन फडणवीसांनी दिले. शिवाय या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्याचेही स्पष्ट केले. बीडच्या पोलिस अधिक्षकांची बदली करण्याचे आदेश फडणवीसांनी दिले.
  • या प्रकरणात पोलिसांचा हलगर्जीपणा दिसला. त्यामुळे बीडच्या पोलिस अधिक्षकांची बदली करण्याचे आदेश फडणवीस यांनी दिले. 
  • अगोदर फिर्याद नोंदवायची व नंतर बी समरी करायची, या बीड पोलिसांच्या कार्यपद्धतीवर फडणवीसांनी ताशेरे ओढले. संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण अतिशय गंभीर आहे. देशमुख यांच्या हत्येपर्यंतच हे प्रकरण मर्यादीत नाही. त्यामुळे या हत्येमागची पाळेमुळे शोधून काढली पाहिजेत. कंपनीचे काम मिळवण्यासाठी खंडणी मागितली जात आहे. एका ऊर्जा क्षेत्रातील कंपनीने बीडमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. या माध्यमातून येथे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. काही जणांकडून काम आम्हालाच द्या, नाहीतर खंडणीची मागणी होत आहे. याच गुन्ह्यात ६ डिसेंबर रोजी कंपनीचे कार्यालय जिथे आहे तिथे काही जण गेले. त्यांनी तेथे वॉचमनला मारहाण आणि शिवीगाळ केली.
  • सीनियर प्रोजेक्ट मॅनेजरलाही मारहाण करण्यात आली. मारहाण झाल्यामुळे पीडितांनी सरपंचांना कॉल केला. बाजूच्या गावातील आरोपी मारहाण करत असल्याने सरपंच तेथे तातडीने दाखल झाले. ९ डिसेंबरला संतोष अण्णा चारचाकी वाहनातून गावी परत जात असताना टोलनाक्यावर त्यांची गाडी अडवण्यात आली. गाडीच्या काचा फोडून हल्लेखोरांनी त्यांना बाहेर काढले. स्कॉर्पिओ गाडीत टाकून त्यांना मारहाण केली. तारांनी गुंडाळून मारहाण केली. वाहनातून उतरवून पुन्हा मारहाण केली. या मारहाणीत संतोष मरण पावल्याचे लक्षात येताच हल्लेखोरांनी तेथून पळ काढला, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

Related Articles

Back to top button