क्राईम

ब्रेकिंग! संजय राऊतांच्या बंगल्याची अज्ञातांकडून रेकी

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या घराची दोन अज्ञात इसमांनी रेकी केली. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास ही रेकी करण्यात आली. अज्ञात इसमांनी दहा मोबाईल कॅमेरे लावून ही रेकी केली. या प्रकरणानंतर खळबळ उडाली आहे. यासंदर्भात विधिमंडळातही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

राऊत हे मुंबईच्या पूर्व उपनगरात असलेल्या भांडुपमध्ये राहतात. राऊत यांच्या भांडुपमधील मैत्री बंगल्याची आज सकाळी नऊ ते साडेनऊच्या सुमारास ही रेकी करण्यात आली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. या व्हिडिओत राऊत यांच्या घराबाहेर दोन अज्ञात व्यक्ती बाईकवरुन आल्याचे दिसत आहे. या व्यक्ती राऊत यांच्या घराच्या मागील बाजूस आल्या होत्या. काही सेंकद ते तिकडे थांबले. त्यांच्याकडे 8 ते 10 मोबाईल होते. त्यांनी राऊतांच्या बंगल्याचे फोटो काढले. त्यानतर ते यूटर्न घेऊन निघून गेले. त्यातील एकाने हेल्मेट घातले होते. तर दुसऱ्याने आपला चेहरा पूर्णपणे झाकलेला होता. हे दोघे लोक रेकी करत असताना राऊत यांच्या घरी कोणीच नव्हते.

रेकी करणारी गाडी उत्तर प्रदेश किंवा बिहारमधील असल्याची शक्यता राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी व्यक्त केली. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस राऊतांच्या घरी पोहोचले आहेत. रेकी करणाऱ्या दोघांची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.

Related Articles

Back to top button