एकनाथ शिंदेंचा ठाकरेंबाबत मोठा निर्णय
शिवसेनेत बंड होऊन दोन वर्षांपूर्वी त्यात दोन गट पडले. एकनाथ शिंदे यांनी सुमारे ४० आमदारांना सोबत घेत भाजपशी हातमिळवणी करत मुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेतले. यामुळे ठाकरे गट सत्तेबाहेर राहिला. त्यानंतर या दोन्ही गटांबाबत न्यायालयात दावे सुरु झाले. त्यात शिवसेनेचे चिन्ह व पक्ष हे दोन्हीही शिंदे गटाला मिळाले. मात्र, तेव्हापासून पक्षाच्या चल-अचल संपत्तीबाबत दावे सुरु होते. आता याच प्रकरणात एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेत २०२२ पूर्वीचे शिवसेनेच्या खात्यावरील सर्व पैसे उद्धव ठाकरेंना देण्याचे ठरवले आहे.
दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत बंड झाले. निवडणूक आयोगाने शिंदे यांचा दावा मान्य करत शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे यांना दिला. त्याचवेळीशिंदे यांनी शिवसेनेची संपत्ती आणि बँकेतील रक्कमेवर दावा करणार नसल्याचे सांगितले होते. त्यानुसार शिंदे यांनी 2022 पूर्वी शिवसेनेच्या बँक खात्यात असणारी रक्कम ठाकरे गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत शिंदे गटाने ठाकरे गटाला कळविलेही आहे.
शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर ठाकरे गट आर्थिक अडचणीत आला आहे. गेल्या निवडणुकीतही ही अडचण उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे बोलून होती. आता ठाकरेंची हीच अडचण दूर होणार आहे. शिवसेनेच्या खात्यावरील २०२२ पूर्वीची सर्व रक्कम ठाकरे गटाला मिळणार आहे. दरम्यान शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. शिंदे यांचा हा निर्णय उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. दोन्ही पक्षातील राजकीय कटुता विसरुन शिंदे यांनी एक नवीन उदाहरण महाराष्ट्रासमोर ठेवले आहे.