देश - विदेश

बिग ब्रेकिंग! संसद परिसरात मोठा राडा

काँग्रेस पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप करत भाजप खासदारांनी संसदेत निदर्शने केली. मात्र, या निदर्शनावेळी भाजपचे ज्येष्ठ खासदार प्रताप सारंगी जखमी झाले असून विरोधी पक्ष नेते राहुल गांधींनी आपल्याला ढकलल्याने हा प्रकार घडल्याचा गंभीर आरोप प्रताप सारंगी यांनी केला आहे. या घटनेत सारंगी यांच्या डोक्याला दुखापत झाल्याचे समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

राज्यघटनेचे निर्माते डॉ.आंबेडकर यांच्यावर गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर संसदेत संघर्ष पेटला आहे. आज संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी संसदेच्या आवारात भाजप आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये बाचाबाची झाली. त्यात सत्ताधारी पक्षाचे खासदार प्रताप सारंगी जखमी झाले. सारंगी यांच्या डोळ्याला दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे.

या घटनेबाबत बोलताना सारंगी म्हणाले की, राहुल गांधींनी एका खासदाराला धक्का दिला. त्यावेळी मीदेखील खाली कोसळलो. मी पायऱ्यांजवळ उभा होतो. तेव्हा राहुल आले आणि त्यांनी एका खासदाराला धक्का दिल्याचे सारंगी यांनी म्हटले आहे. दरम्यान राहुल गांधींनी धक्काबुक्की केल्याचा आरोप फरुखाबादचे खासदार मुकेश राजपूत यांनीही केला आहे.

Related Articles

Back to top button