क्राईम
सरपंच संतोष देशमुखला दोनशे फटके मारले, पाणी मागताच नराधमांनी…
- बीड तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला आहे . या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे देण्यात आला आहे. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची संख्या आता चारवर गेली आहे. देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. यामध्ये देशमुख यांचा मृत्यू अति रक्तस्रावाने झाल्याचे म्हटले आहे. आठ पानांचा हा अहवाल वाचल्यास संतोष यांना किती छळ करुन भयंकर क्रूर पद्धतीने मारण्यात आले, याची कल्पना येऊ शकते.
- देशमुख यांचे 9 डिसेंबरला अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात विष्णू चाटे याच्यासह चौघांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. अद्याप तीन आरोपी फरार आहेत. विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्या जवळचा माणूस असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे देशमुख यांच्या हत्येच्या गुन्ह्यात कराड यांचा सहभाग असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. भाजपचे आमदार सुरेश धस आणि जितेंद्र आव्हाड यांनी देशमुख हत्याप्रकरणाचा अंगावर काटा आणणारा तपशील विधानसभेत मांडला होता.
- शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे की, संतोष देशमुख यांना दोनशे फटके मारले, जबर मारहाण करण्यात आली. त्यांच्या अंगावर विविध ठिकाणी मुका मार दिल्याने अतिरक्तस्राव झाला आहे. त्यामुळे ते शॉकमध्ये गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.