ब्रेकिंग! राज्यात थंडीची आणखी तीव्र लाट येणार?
राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर कायम आहे. राज्यातील चारही विभागातील जिल्ह्यात तापमानात मोठी घट झाली आहे. किमान तापमान दहा अंशांच्या खाली आले आहे. पुण्यात काल ८ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अहमदनगरमध्ये ५.६ एवढ्या कमी तापमानाची नोंद झाली. नाशिकमध्ये देखील पारा हा ८ अंशांवर आला आहे. पुढील काही दिवस सोलापूर, पुणे, विदर्भ, मराठवाडा या सर्व भागांमध्ये थंडीचा जोर वाढणार आहे. उत्तर भारतात तर मोठ्या प्रमाणात थंडीची लाट आली आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, एक कमी दाबचे क्षेत्र नैऋत्य बंगालच्या उपसागरावर स्थित आहे.
तसेच पुढील दोन दिवसात त्याची तीव्रता वाढून ते तमिळनाडू किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता आहे. याचा परिणाम राज्याच्या हवामानावर होणार आहे. महाराष्ट्रातील चारही उपविभागांमध्ये पुढील पाच ते सहा दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
तर किमान तापमानात तीन ते चार डिग्रीने वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात पुढील तीन दिवस आकाश मुख्यत: निरभ्र राहणार असून सकाळी विरळ धुके पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर २० ते २३ डिसेंबरपर्यंत आकाश मुख्यत: निरभ्र राऊत दुपारी किंवा संध्याकाळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर सकाळी विरळ धुके पडण्याची शक्यता आहे.