ब्रेकिंग! ऐन दिवाळीत शरद पवारांचा नवा बॉम्ब

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. पोलिसांकडून देखील आदर्श आचारसंहिते दरम्यान कारवाई करत मोठी रक्कम जप्त करत आहे. पोलिसांनी कारवाई करत मुंबई, पुणे, नगरसह राज्यातील अनेक ठिकाणांहून मोठी रक्कम जप्त केली आहे.
यावरून महाविकास आघाडीचे नेते राज्य सरकारवर जोरदार टीका करत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गोविंद बागेत आज दिवाळी पाडवा कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना महायुतीच्या उमेदवारांना पोलीस दलाच्या गाड्यांमधून रसद पुरवली जात आहे, असा आरोप केला आहे.
या सरकारचे एक वैशिष्ट्य आहे. सरकारने विमानाने एबी फॅार्म पाठवले. पोलीस दलाच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद पुरवली जात आहे. हे मी जाहीरपणे सांगणार होतो. मात्र, माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांचे नाव जाहीर करु नये, अशी गळ घातली आहे, असे पवार म्हणाले.