ब्रेकिंग! आधार कार्डच्या नियमात बदल

सोलापूर शहर व अन्य भागात आधार कार्डधारकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, आधार कार्डशिवाय कोणतेही सरकारी काम होणे शक्य नसते. तसेच केवळ सरकारीच नव्हे तर बँक, शाळा, महाविद्यालय इतकेच काय तर प्रवासाठीही आधार कार्ड महत्वाची भूमिका पार पाडते. ज्या व्यक्तीचे आधार कार्ड काढायचे आहे, ती व्यक्ती प्रत्यक्ष तिथे उपस्थित लागते. तसेच त्या व्यक्तीचे बायोमॅट्रिक लागते. परंतु आता याची गरज भासणार नाही.
अनेकदा अनेक जणांच्या बोटाला दुखापत झाल्यामुळे आपले बायोमॅट्रिक काम करत नाही आणि अश्यावेळीच आधार कार्डशी संबंधित गोष्टीचे काम पडते. त्यामुळे अशी समस्या उद्भवू नये, यासाठी मोदी सरकारने बायोमॅट्रिक शिवाय आणि डोळ्यांच्या स्कॅनिंग शिवाय आधार कार्ड बनवता येण्याची घोषणा केली आहे.
असे आधार कार्ड काढण्यासाठी तुम्हाला वैध वैद्यकीय कारण द्यावे लागणार आहे आणि विना बायोमॅट्रिकचे आधार कार्ड मिळवता येणार आहे. आत्तापर्यंत तब्बल 29 लाख लोकांनी बायोमॅट्रिक शिवाय आधार कार्ड बनवून घेतल्याची माहिती सरकारने दिली आहे.