क्राईम
पुण्यात हायप्रोफाईल ‘बंटी-बबली’ गजाआड

पुण्यात मोठ्या सोसायट्यांमध्ये चोरी करणाऱ्या हायप्रोफाइल बंटी बबलीला गजाआड करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. हे चोरटे अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होते.
अखेर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल एक कोटी १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुण्यात मोठ्या सोसायट्यांमध्ये चोरी करणाऱ्या हायप्रोफाइल बंटी बबलीला गजाआड करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे.
हे चोरटे अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होते. अखेर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १ कोटी १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी काळमेध याला अटक करण्यात आली होती. त्याची चौकशी केली असता त्याने उडवा उडावीची उत्तर दिली. मात्र, त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी चोरी केल्याचे कबूल केले. यात त्याची मेहुणी यात सहभागी असल्याचे त्याने सांगितलं. सोनिया ही मुद्देमाल घेऊन फरार होण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी तिला रंगेहाथ पकडले.