राजकीय
बिग ब्रेकिंग! शपथविधी आधी हायव्होल्टेज ड्रामा
- देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसाठी भाजपाकडून जोरदार तयारी सुरू आहे. सायंकाळी पाच वाजता फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. याशिवाय अजितदादा पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे त्यांनीच काल झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. मात्र एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही हा तिढा अद्याप सुटलेला नाही. शपथविधी सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक असताना समोर आलेल्या निमंत्रण पत्रिकेत कुठेच शिंदेंच्या नावाचा उल्लेख नाही. दरम्यान शिंदे गटाचे प्रवक्ते उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे लवकरच आपला निर्णय जाहीर करतील, असे सांगितले.
- भाजप, शिंदे गट आणि अजितदादा गटाकडून शपथविधी सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिका समोर आल्या आहेत. मात्र एकाही पत्रिकेत शिंदेंच्या नावाचा उल्लेख नाही. भाजपच्या निमंत्रण पत्रिकेत फडणवीसांचे नाव आहे. त्याशिवाय शिंदे गटाच्या पत्रिकेतही मुख्यमंत्री फडणवीसांचा उल्लेख आहे, तर अजितदादा पवारांच्या पत्रिकेत मुख्यमंत्रिपदी फडणवीस आणि उपमुख्यमंत्रिपदी अजितदादा यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र या पत्रिकेत शिंदेंचे नाव नाही. महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री कोण असतील याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ड्रामा निर्माण झाला आहे.