महाराष्ट्र

ब्रेकिंग! संजय राऊतांचा खळबळजनक दावा

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आज देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत. मात्र, एकनाथ शिंदे हे नाराज असल्याने ते आज शपथ घेणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, यावर खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत शिंदे यांच्यावर टीका केली आहे. शिंदे यांच्यात दिल्लीशी पंगा घेण्याची हिम्मत नाही. त्यामुळे ते आज शंभर टक्के शपथ घेतील, असे राऊत म्हणाले. उपमुख्यमंत्रीपद हे अजितदादा पवार यांच्यासाठी आरक्षित केले आहे, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

राजधानी दिल्लीत राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी फडणवीसांवर आणि शिंदेंवर निशाणा साधला आहे. राऊत म्हणाले, फडणवीस हे मुख्यमंत्री होणार आहेत. फडणवीसांना शुभेच्छा. राज्याची लूट होऊ न देण्याची जबाबदारी त्यांची आहे. गेल्या डीच वर्षात राज्यातील संपत्तीवर दरोडे पडले आहेत. शिंदे हे आज शंभर टक्के उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यांच्याकडे दुसरा कोणता पर्याय राहिलेला नाही. दिल्लीसमोर लढायची हिम्मत त्यांच्यात नाही. ती ताकद त्यांनी अडीच वर्षांपूर्वीच गमावली आहे. 

शिंदे यांचे युग संपले आहे. भाजपला केवळ त्यांची दोन वर्षांची गरज होती. भाजप शिंदे यांचा पक्ष देखील फोडू शकतो. फडवणीस यांच्याकडे बहुमत आहे. असे असतांनादेखील दहा दिवस झाले तरी सरकार बनले नाही. त्यामुळे महायुतीत मोठी गडबड आहे, हे दिसून आले आहे. हे सर्वजण स्वार्थासाठी एकत्र आले आहेत.

Related Articles

Back to top button