महाराष्ट्र
ब्रेकिंग! उद्धव ठाकरे आता प्रखर हिंदुत्वाकडे

- लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बूस्ट मिळाला होता. सहा महिन्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुरती दाणादाण उडाली. सहानुभूतीची मते ठाकरेंना मिळाली नाहीत. कशातरी 20 जागा निवडून आल्या. महाविकास आघाडीच्या सगळ्याच डावपेचांवर भाजपची रणनीती सरस ठरली. आता आपले कुठं चुकले, काय कारणे होती, ज्यामुळे इतका मोठा पराभव पदरी पडला याची उत्तर शोधली जात असतानाच मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे ठाकरे गटाने या निवडणुकांची तयारी आतापासूनच सुरू केली आहे.
- उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भाजपचे बाहेरच्या राज्यातील लोक महाराष्ट्रात येऊन काम करतात, त्या पद्धतीनेच आपण आता काम केले पाहिजे. शिवसैनिकांनी तळागाळात जाऊन कामाला लागले पाहिजे, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
- शिवसेनेकडून हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने मुंबई महापालिका निवडणुकीत लोकांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन करा. हिंदुत्वासाठी शिवसेना आधीही लढत आहे, उद्याही लढेल आणि पुढेही लढत राहणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. आपल्या पक्षाने हिंदुत्वाचा मुद्दा सोडला, अशा प्रकारचा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे. त्याला योग्य प्रत्युत्तर द्या, अशा सूचना ठाकरेंनी या बैठकीत दिल्या.
- भाजप पक्षाचे बाहेरच्या राज्यातून लोक येऊन पक्षासाठी काम करतात, तसे आपणही तळागाळात जाऊन काम केले पाहिजे, असे मत ठाकरेंनी माजी नगरसेवकांसमोर मांडले.तसेच मुंबई महापालिकेत महाविकास आघाडी सोबत न जाता एकट्याने लढायचे का ? याचा निर्णय ठाकरे घेतील.