महाराष्ट्र
ट्विस्ट! शिंदे यांच्या मागे दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती

- महायुतीकडून शपथविधीची तयारी सुरू आहे. पण, शिंदेंच्या शिवसेनेत एकप्रकारे शांतता आहे. त्याला कारण आहे, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. आजारी असल्यामुळे ते महायुतीच्या कोणत्याही बैठकीत सहभागी नाहीत. परंतु, ते नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठा दावा केला आहे.
- महायुतीत सत्ता स्थापनेचा जो तिढा निर्माण झाला आहे आणि जो खेळ सुरू आहे.
- या सगळ्यात एकनाथ शिंदे यांना दिल्लीतील भाजपचे काही नेते रसद पुरवत आहेत, असे उद्धव यांनी म्हटले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ‘मातोश्री’वर आमदार, नेते, माजी नगरसेवकांची बैठक बोलण्यात आली होती. तेव्हा ठाकरे बोलत होते.
- सध्या सुरू असलेल्या सत्तास्थापनेत शिंदे यांच्या मागे दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती आहे. भाजपला मुंबई महापालिका जिंकायची आहे, असे उद्धव यांनी सांगितले.



