महाराष्ट्र
ब्रेकिंग! भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर
- विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळवल्यानंतर अखेर पाच डिसेंबरला महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे. मुख्यमंत्री कोण होणार? हे भाजपच्या उद्याच्या बैठकीत ठरवले जाणार आहे. यातच भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे. विभागनिहाय 16 नेत्यांना संधी देण्यात येणार आहे. पण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील दोन बड्या नेत्यांनी नेत्यांची नाव यादीत नसल्याने चर्चा रंगल्या आहेत.
- मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या संभाव्य यादीत आशिष शेलार, रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, नितेश राणे आणि गोपीचंद पडळकर यांची नावे आहेत.
- मात्र, पश्चिम महाराष्ट्रातील बडे नेते, कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील आणि बल्लाळपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा यादीत समावेश नसल्याने त्यांचा पत्ता कट झाला का? अशी चर्चा सुरू झाली आहे.