महाराष्ट्र

ब्रेकिंग! भल्या पहाटे महाराष्ट्राला भूकंपाचे धक्के

आज पहाटे तेलंगणा राज्यातील मुलुगू जिल्ह्यात भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता 5.3 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. हा भूकंप मुलुगू जिल्ह्यात झाला असला तरी त्याचे धक्के महाराष्ट्राला बसले आहेत. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांत भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाने नागरिकांत भीतीचे वातावरण तयार झाले आहे. सुदैवाने या भूकंपाने कोणतीही जीवितहानी झाली नाही तसेच मोठे नुकसानही झालेले नाही.

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, एटापल्ली, चामोर्शी या जिल्ह्यांत घराच्या वरच्या मजल्यांवर राहणाऱ्या लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले. घरातील फ्रीज, भांडी आणि खिडक्यांच्या काचांना हादरे बसले. त्यामुळे भयभीत झालेल्या लोकांनी घराबाहेर धाव घेतली. या भूकंपात कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. नागरिकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Related Articles

Back to top button