बिजनेस

खुशखबर ! पीएफचे पैसे एटीएममधून काढता येणार?

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेशी संबंधित काही महत्त्वाचे बदल करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. त्यासाठी सरकार नवी योजना जाहीर करणार आहे. ही योजना ग्राहकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असेल. कारण, या योजनेच्या अंतर्गत पीएफचे पैसे काढण्यासाठी एटीएमचा पर्यायही दिला जाण्याची शक्यता आहे.

एटीएमच्या माध्यमातून पीएफ काढण्यासाठी कामगार मंत्रालय कार्ड जारी करण्याची तयारी करत असल्याचे सांगितले जात आहे. भविष्य निर्वाह निधीतील कर्मचाऱ्यांच्या योगदानावरील १२ टक्के मर्यादा ईपीएफओकडून काढून टाकली जाण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांना लवकरच त्यांच्या बचतीच्या नियोजनानुसार व स्वत:च्या प्राधान्याक्रमानुसार पीएफ खात्यात योगदान देण्याची सुविधा मिळू शकते. ही योजना सध्याच्या मर्यादेपेक्षा जास्त ठेवींना परवानगी देऊ शकते. मात्र, हा प्रस्ताव सध्या प्राथमिक चर्चेच्या टप्प्यात आहे.

Related Articles

Back to top button